सेलू ( नारायण पाटील )
शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील फुलारी गल्लीतील नादुरुस्त रोहित्र व विजेच्या इतर समस्या बाबत सामाजिक कार्यकर्ते बंडू देवधर यांनी आज टिळक पुतळ्यासमोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषण सुरू केले होते .
याबाबत माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी उपोषण स्थळी भेट देऊन महावितरण च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला .व त्वरित महावितरण चे उपअभियंता नागनाथ शकरवार व शहर अभियंता प्रवीण थोरात यांनी उपोषण कर्ते बंडू देवधर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व सर्व समस्यांचे निवारण त्वरित करण्याचे आश्वासन दिले .फुलारी गल्ली तील रोहित्र वरील अतिरिक्त झालेला दाब कमी करून या रोहित्र वरून वीज पुरवठा खंडित होणार नाही .याबाबत दक्षता घेण्याचे स्पष्ट केले .तसेच प्रभागातील आवश्यक त्याठिकाणी विजेचे पोल टाकून लोंबकळत असलेल्या तारा देखील त्वरित दुरुस्त केल्या जातील .तसेच शहरातील फ्यूज कॉल सेंटर वर आमचा स्वतंत्र कर्मचारी बसवण्यात येईल व नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्यात येतील असेही यावेळी अभियंता शकरवार यांनी सांगितले .यावेळी उपस्थित असलेल्या बबलू मंडलिक , गुड्डू मंडलिक ,सुनील गायकवाड यांनी देखील विजेबाबतच्या समस्या सांगितल्या .तसेच फ्यूज कॉल सेंटर बद्दल नाराजी व्यक्त केली .
भविष्यात नागरिकांना विजेबाबत समस्याना तोंड देण्याची वेळ येणार नाही व उपोषण करावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले
Shabdraj www.shabdraj.com