04/02/26
Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रकला स्पर्धेत दिड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

परभणी,दि 28 ः
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शालेय विध्यार्थी साठी  चित्रकला स्पर्धेचे आयोजन माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली  रविवार 27 जुलै रोजी सकाळी 10 ते 01 वाजता परभणी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे घेण्यात आली.

ही स्पर्धा 5 वी ते 7 वी (लहान गट) व 8 वी ते 10 वी (मोठा गट) या दोन गटात मूले व मूली साठी स्वतंत्र होती. या स्पर्धेत विद्यार्थांना मोफत प्रवेश दिला गेला. मोठ्या गटातील प्रथम विजेता 1)आरुष सुनिल माळोदे यास 5100 ₹ बक्षीस दिले, द्वितीय बक्षीस 2)अद्वैत अविनाश कंधारकर यास 3100 ₹ व तृतीय पारितोषिक 3)ओंकार गणेश लांडगे 2100 ₹ त्याच प्रमाणे मुलीमधून प्रथम 1) आर्या नरहरी काळे, द्वितीय 2) मृणाल मुरलीधर देशमुख तृतीय, 3)सिद्धी हनुमान रणेर यांना मिळाले तसेच लहान गटातील मुलामध्ये प्रथम विजेता 1) प्रितेश जगनाथ खरवडे द्वितीय, 2) अतुल जाधव तृतीय, 3) आत्मज रंजिता चांदविले यांना मिळाले. मुलीमध्ये प्रथम बक्षीस 1) संहिता प्रवीण नाईक, द्वितीय 2) अदिती शिवानंद जमसेटे आणि तृतीय 3) सम्रधी लक्षमनराव गारकर या मुलींना मिळाले आहेत. स्पर्धेत मूकबधिर विद्यालयातील मुलांनी सहभाग घेत्याबद्दल त्यांनाही विशेष म्हणून प्रथम क्रमांक 1) अभिषेक चंदू गवारे, द्वितीय 2) शिवकन्या बंडू चापके तृतीय 3) अश्विनी नागोराव खिलारे यांना देण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विध्यार्थीना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. या स्पर्धेतील वीजेत्यांना लगेच दुपारी 1 ते 2 वाजता श्री.प्रताप भैया देशमुख, ज्ञानेश्वर नाटकर, नंदाताई राठोड, रोहन समाले, संजय कदम, शंकर भागवत, दिपक वारकरी, राजेंद्र वडकर मा. नगर सेवक पंजाब पतंगे, राजू शिंदे, बबन मूळे, चांदुराम बोराडे, बबन मकासरे इतर मान्यवराच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेत जवळपास 1500 विध्यार्थीनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा. रामेश्वर आवरगंड व आभार प्रदर्शन सुदाम तूपसुंदरे यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश काळे, सुरेंद्र रोडगे, सचिन पाचपुंजे, अनिल गोरे, सचिन सोनटके, रामदास कदम, माणिक भद्रगे, अकबर अली, मोईन खान, शमशू हाशमी, सय्यद अस्लम फौजी, विनोद कणकूटे, माही दांडगे, विनोद खरात, विजय धरणे, विजय काळे, रामभाऊ भवर, संकेत वाकले, वैभव शिंदे, सुरेश प्रधान, माणिक अशोले, शेख इकबाल दावत, किरण लोखंडे, साजिद भाई, विद्या जोंधळे, महादेवी स्वामी, प्रभा हटकर आदिनी प्रयत्न केले…

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …