पाथरी,दि 30 (प्रतिनिधी)ः
शिवसेना नेते सईद खान यांनी पाथरी तालुक्यातील हादगावला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतजमिनी, घरांची पडझड, जनावरांचे हाल इत्यादी विषयी सविस्तर माहिती घेत शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन दिले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पाथरी तालुक्यातील हादगाव गावात पाणी शिरल्याने शेतीचे,घरांचे आणि जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले होते. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील अनेक गावांत शेतीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान, घरांचे भगदाड पडले आहे. तसेच दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.
यानिमित्ताने आज शिवसेना नेते सईद खान यांनी हादगावला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या संकटाच्या क्षणी नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये, यासाठी मी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून बाधितांना शक्य तेवढी तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू करणार असल्याचे यावेळी शिवसेना नेते सईद खान यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त लोकांना धीर आला.
Shabdraj www.shabdraj.com