सेलू / प्रतिनिधी – सेलू शहरातील लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्रा आयोजीत भारत देशाचे महान गायक मोहंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दिनांक 31 जुलै गुरूवार रोजी सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात संध्याकाळी सहा वाजता एक शाम मोहंमद रफी के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते गोविंद भाऊ जोशी, तर प्रमूख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी सर, नूतन विद्यालयचे मुख्याध्यापक किरण देशपांडे सर, नूतन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश माळवे सर, माजी नगरसेवक पठान रहिम खान, शिक्षक शेख महेमुद सर, समाजवादी पार्टीचे नेते सय्यद दिलावर भाई यांची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पहार घालून करण्यात आले गीत गायन कार्यक्रमाची सुरूवात सर्व मान्यवरांच्या हस्ते मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजक पत्रकार अबरार बेग यांनी केले सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले.
गीत गायन कार्यक्रमात गायक कलाकार पत्रकार अबरार बेग, सय्यद उस्मान, डॉ जफर फारुखी, सय्यद जाकेर लाला, प्रदीप शिंदे, मोहम्मद आसेफ सर, शेख जमील,मुसा खान पठाण, विकास कुमार, यांनी आपल्या गोडवाणीतून एकाहून एक मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गीत स्वदेशी मानवा, अपनी आँखो में बसाकर, तुझ्को पुकारे मेरा प्यार, ये खिडकी जो बंद रहेती है, नझर ना लग जाए, आजा तूझ्को पुकारे मेरे गीत, चाहुंगा मै तुझे, गाऊन उपस्थित श्रोते रसिक यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे हैद्राबाद येथील ज्युनियर मिथुन चक्रवर्ती शेख मुजीब यांचा डान्स होता शेवटी लक्की म्युझिकल ऑर्केस्ट्राचे संचालक अझहर बेग उर्फ लक्की यांनी आभार व्यक्त केले.
Shabdraj www.shabdraj.com