16/10/26
Breaking News

सेलूत संगीतमय भागवत कथेचे आयोजन

सेलू / नारायण पाटील – पावन पुण्य श्रावणमासाचे औचित्य साधून सेलूत संगीतमय भागवत कथेचे आयोजन शास्त्री नगर मधील अष्टविनायक गणेश मंदिर मध्ये आयोजन करण्यात आले आहे .

दि.२ ते ८ औगस्ट दरम्यान दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत भागवताचार्य ह भ प नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृतमय व रसाळ वाणी मधून या भागवत कथेचे निरूपण केले जाणार आहे .

 

यामध्ये दि ८ औगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ह भ प जयराम महाराज तांगडे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून भागवत कथा व कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा .असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अष्टविनायक गणेश मंदिर व वटेश्वर महादेव मंदिर शास्त्री नगर सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …