04/02/26
Breaking News

पूर्णा शहरात आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी व रिंगण सोहळा संपन्न

पूर्णा / प्रतिनिधी – पूर्णा शहरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त स्वातंत्र्य सैनिक (कै) दाजी साहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला.

पूर्णा येथील नवा मोंढा मैदानावरून तालुक्यातील विविध वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ त्याच बरोबर विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अध्यात्मिक देखावे, विविध पथक, पारंपारिक वेशभूषेतील भाविकांसह पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील विविध गावातून वारकरी संप्रदायातील महिला व पुरुष सहभागी झाले होते वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांतील चिमुकले वारकरी पारंपारिक वेशभूषांसह या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते . व्यापारी असोसिएशन व विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने जागोजागी पालखी चे स्वागत करण्यात आले. नवा मोंढा येथे सकाळी आठ वाजता पांडुरंगाची पूजा करून पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. पालखी छत्रपती संभाजी महाराज चौक – स्टेट बँक ऑफ इंडिया – महात्मा बसवेश्वर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – महादेव मंदिर- श्री गुरु बुद्धी स्वामी मठ संस्थान – संत नरहरी महाराज चौक मार्गे जुना मोंढा मैदानावर पोहचली. त्या ठिकाणी भव्य रिंगण सोहळा संपन्न झाला त्या वेळी अश्व रिंगण सोहळ्यात लक्षवेधी ठरला जणू पंढरपुरामध्येच रिंगण सोहळा होत असल्याचा आनंद भाविकांना मिळाला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठलाच्या गजराने जुना अवतरले पंढरपूर दिसून आले. तर शहरामध्ये बऱ्याच ठीक ठिकाणी प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी व भाविक भक्त मंडळींनी फळांची पाणी बिसलरी व फराळाची व्यवस्था केली होती या ठिकाणी वारकरी यांनी फुगडी, पावली खेळली. या सोहळ्याचे संयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कदम, कार्याध्यक्ष डॉ. हरिभाऊ पाटील, सरचिटणीस जगदीश जोगदंड, कार्यवाह संतोष एकलारे, सहकार्यवाह अमृतराज कदम, गोपाळ भुसारे, मुंजाभाऊ कदम, अमित कुलथे, गणेश कदम, आनंद अजमेरा,डॉ. अजयसिंह ठाकूर, सचिन उर्फ पप्पू कदम, डॉ. जयप्रकाश मोदानी, ज्ञानोबा कदम, अजय एकलारे, रवी कदम, विशाल चितलांगे, दत्ता कदम, नितीन काबरा, कृष्णा कदम, किरण कुलथे, विनायक कदम, रामजी भालेराव, पप्पू कदम, अविनाश नवघरे, गोपाळ कदम, कैलास मुळे, केशव कदम यांच्यासह प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी व सदस्य यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …