04/02/26
Breaking News

मोहंमद रफी यांच्या जयंती निमित्त सेलूत संगीत मैफिल ” शाम ए सरगम” तर्फे संगीतमय मानाचा मुजरा

सेलू ( प्रतिनिधी )
प्रसिद्ध गायक मोहंमद रफी यांच्या १०१ व्या जयंती निमित्त येथील सेवानिवृत्त संघ सेलू यांच्या वतीने संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते .
दि २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त संघाच्या पेन्शन भवन मधील विसावा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून येथील उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ संजय हरबडे , ऍड .सुभाषराव भरदम यांची तर कार्यक्रमाचे संयोजक श्यामसुंदर आढे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती .
मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय मोहंमद रफी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
यावेळी सेलूचे मोहंमद रफी म्हणून ओळख असलेले जेष्ठ गायक उत्तमराव दिशागत सर तसेच सर्व सहभागी गायकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .या संगीत मैफिली मध्ये सहभागी गायकांनी कै मोहंमद रफी यांनी गायलेली एकापेक्षा एक सरस अशी गाणी सादर करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला .
यामध्ये प्रदीप शिंदे यांनी सुख के सब साथी व क्या हुवा तेरा वादा ही गीते सादर केली .विनोद मोगल यांनी छू लेने दो नाजूक ओठोको व मस्त बहारोका मै आशिक ही गीते सादर केली .सदाशिव जाधव यांनी शोधीशी मानवा राऊळी मंदिरी हे भक्तीगीत सादर करून रसिकांची दाद मिळवली .मोहन कुलकणी यांनी” ए फुलोकी राणी ” वादिया मेरा दामन ही गीते सादर केली . ” ओ मेरी महेबूबा तुझे जाना है तो जा ” व मुझे कितना प्यार है तुमसे “ही गीते अशोक वानरे यांनी सादर केली .व रसिकांची खूप दाद मिळवली .यानंतर दुर्गादास कुलकर्णी यांनी मेरे हमदम मेरे दोस्त या चित्रपटातील” छलकाये जा” व “आज मोसम बडा बेईमान है बडा ” ही गीते सादर केली .
कार्यक्रमाचे संयोजक श्यामसुंदर आढे यांनी कै मोहंमद रफी यांनी “पगला कंही का” या चित्रपटातील” तुम मुझे भुला ना पाओगे” हे व दिल का सुना सा तराना ढुडेगा ” ही गीते सादर करून त्यांना आदरांजली वाहिली .सुभाष भरदम यांनी “आपकी हसीन रु पे ” मेरी मोहबत जवा रहेगी ” ही गीते सादर केली .जेष्ठ गायक उत्तमराव दिशागत यांनी हम अपनी आझादी को मिटा सकते नहीं ” हे देशभक्तीपर गीत सादर केले .डॉ शैलेश मालानी यांनी यावेळी “एहसान तेरा होगा मुझपर ”
हे गीत सादर केले .
प्रमुख अतिथी असलेले डॉ संजय हरबडे यांनी ” दर्दे दिल दर्दे जिगर दिल मे जगाया आपने “हे व अठरा बरस की तू होने को आई रे ” ही गीते सादर केली .डॉ प्रदीप पांडव यांनी ” ये दुनिया जहाँ है ” हे गीत सादर केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदभाऊ जोशी यांच्या अध्यक्षीय समरोपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक वानरे यांनी केले तर मोहन कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …