सेलू /प्रतिनिधी
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात श्री.गणेशोत्सव
निमित्त स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर यांच्या हस्ते श्री.गणेशाची स्थापना करण्यात आली.’ऑपरेशन सिंदूर’ चा देखावा सादर करण्यात आला आहे.
पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ७ मे २०२५ (बुधवार )रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’असे नाव देण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी व आपली मातृभूमी सर्वप्रथम व नंतर आपण ही राष्ट्रभावना वृद्धिंगत होण्यासाठी या देखाव्याचे नियोजन करण्यात आले.
सहशिक्षक मंगेश खरात व चेतन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा देखावा तयार केला आहे.संस्थेचे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी , स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर ,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,मु.अ.शंकर शितोळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Shabdraj www.shabdraj.com