24/03/26
Breaking News

सेवेत मिळालेल्या कामाचा संधी म्हणून स्वीकार केला . शंकर शितोळे

सेलू,दि 14 (प्रतिनिधी)ः
शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या कामाचा मी संधी म्हणून स्वीकार केला व विद्यार्थ्यांना दैवत मानून त्यांच्या यशातच आपले यश समजले .यासाठी मला संस्थेचे कार्यकारी मंडळ व शिक्षकांचे खूप सहकार्य मिळाले .असे विचार निवृत्त मुख्याध्यापक शंकर शितोळे यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले .

विवेकानंद प्राथमिक विद्यालय व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या वतीने सेवानिवृत्त विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर रामकृष्ण शितोळे यांच्या सेवानिवृत्ती व सेवागौरव कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद विद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच विवेकानंद प्राथमिक विद्यालय ,सेलू चे पालक रविकुमार पेशकार हे होते तर स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्यवाह उपेंद्र बेलूरकर ,निवृत्त मुख्याध्यापक आनंदी देशमुख ,स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,जिंतूर येथील संचारेश्वर विद्यालयाचे शालेय समिती सदस्य प्रसाद खर्डेकर , संस्थेच्या अर्थ समितीचे अध्यक्ष सत्येंद्र चौधरी तसेच सत्कार मूर्ती निवृत्त मुख्याध्यापक शंकर शितोळे व त्यांच्या पत्नी मनीषा शितोळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .सीमा आष्टीकर यांनी  स्वागत गीत सादर केले. शितोळे यांचा यावेळी सपत्नीक दोन समई भेट देऊन  सेवागौरव करण्यात आला.  सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले तर अनिल कौसडीकर यांनी  आभार मानले.

Check Also

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. …