06/06/26
Breaking News

अनधिकृत बॅनर होणार कारवाई, महापालिका प्रशासनाच्या कठोर सूचना

परभणी,दि 03 ः
परभणी शहरातील अनधिकृत बॅनर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी महानगरपालिका प्रशासनास आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार परभणी महानगरपालिका अंतर्गत सर्व सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती अ, ब, क, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सी.एस.आय. व एस.आय. यांना शहरातील राजकीय, धार्मिक तसेच व्यावसायिक स्वरूपाचे विनापरवानगी लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर व फलक तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व संबंधितास पावसाळ्याच्या अनुषंगाने कच्चे ऑडीट प्रभाग समिती अंतर्गत अभियंता यांनी करणे व त्यांचा अहवाल सादर करणे. तसेच सर्व मालमत्ता धारक यांना नोटीस देणे तसेच शहरातील मालमत्ता धारक / होल्डिंग एजेन्सी यांना नोटीस द्यावे . शहरातील विनापरवानगी होल्डिंग काढण्याचे आदेश द्यावे असे आदेश मुख्य स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक आणि अभियंता यांना देण्यात आले आहे. असे आदेश आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी दिले आहेत.

Check Also

शेवाळा येथे 30 वय वंदना कार्ड वाटप

हिंगोली, (दि. ६ ): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी “माझं गाव आरोग्य …