परभणी,दि 22 (प्रतिनिधी): मुंबई येथे २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनात परभणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनासाठी कार्यकर्ते रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना होणार असल्याने परभणी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने आज परभणी रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणी स्थानकावरून सुटणाऱ्या राजाराणी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व नंदिग्राम एक्सप्रेस या गाड्यांना आंदोलनकर्त्यांसाठी अतिरिक्त डबे जोडावेत., आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांचा रेल्वे प्रवास मोफत करावा अशी मागणी करण्यात आली.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी होणाऱ्या या ऐतिहासिक आंदोलनात शासन व रेल्वे प्रशासनाने सहकार्य करून कार्यकर्त्यांच्या प्रवासाची योग्य सोय करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी गजानन जोगदंड (महानगराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), गोविंद इककर (जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा मंडळ), स्वप्निल गरुड (मराठा समन्वयक), रमेशराव देशमुख (मराठा समन्वयक), संदीप गव्हाणे (जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ), पांडुरंग शिंदे (अध्यक्ष, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद) व कृष्णा चोपडे (मराठा समन्वयक) आदी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com