दै. शब्दराज / गंगाखेड – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केली आहे.
अलीकडे झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्कालीन तालुका अध्यक्ष गोविंद यादव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पदाचा राजीनामा दिला होता.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे परंपरागत एकनिष्ठ कार्यकर्ते, दिवंगत ॲड. वैजनाथ मुंडे यांचे चिरंजीव ॲड. संतोष मुंडे यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी गंगाखेड तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे.
ॲड. संतोष मुंडे यांच्या निवडीचे काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांकडून सर्वत्र स्वागत व अभिनंदन केले जात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष संघटन मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Shabdraj www.shabdraj.com