04/02/26
Breaking News

अजित पवार आणि महिला IPS अधिकारी, काय आहे नेमके प्रकरण

मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोन संभाषणाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे अंजना कृष्णा यांना कठोर शब्दांत सुनावत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कूर्डू गावाशी संबंधित असून, या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. सदर व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला असून एकाचवेळी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिला आयपीएसला धमकावल्याचं प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सरकारकडून दादांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

 

सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी सुरू असलेल्या मुरूम उत्खननाच्या तक्रारीनंतर पोलिस उपाधीक्षक अंजली कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसोबत त्यांची शा‍ब्दिक चकमक झडली. या दरम्यान, तेथील एका शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून त्यांचे बोलणे उपाधीक्षक कृष्णा यांच्याशी करून दिले. व्हायरल झालेल्या व्हिडीओत कृष्णा यांनी पवार यांचा आवाज ओळखला नसल्याने पवार स्वतःची ओळख देत, तुमची इतकी हिंमत की मला ओळखले नाही, असे पवार बोलत असल्याचे ऐकू येत आहे.

 

त्यावेळी अंजना कृष्णा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, “तुम्ही माझ्या वैयक्तिक मोबाईलवर कॉल करा,” असे सांगितले. यावर पवार संतापलेले दिसून आले आणि त्यांनी, “मी तुमच्यावर कारवाई करीन,” असा इशाराही दिला. त्यानंतर पवार यांनी कृष्णा यांचा मोबाईल क्रमांक घेऊन थेट व्हिडिओ कॉल केला आणि कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

अजित पवार म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.”

Check Also

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता …