सेलू / प्रतिनिधी – येथील शाहू नगर मधील निलकंठेश्वर मंदिर मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेस उत्साहात प्रारंभ झाला असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
दि १९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या नाम सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन ,दुपारी १२ ते ४ या वेळेत श्रीमद भागवत कथा ,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्रौ ८.३० ते १०.३० यावेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे .
आज दि १९ रोजी ग्रंथ मिरवणूक व देवतांचे स्थापन व विधिवत पूजन करण्यात आले .
दररोज १२ ते ४ या वेळेत भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून श्रीमद भागवत कथेचे निरूपण होणार आहे .
यावेळी तबला साथ हभप राम महाराज शिंदे ,हार्मोनियम साथ हभप मारोती अण्णा केवारे तर संगीत साथ महादेव वानरे देणार आहेत .
काकडा भजनाचे नेतृत्व हभप भगवान महाराज गिरी व शाहूनगर महिला भजनी मंडळ करणार आहेत. तर ,हरिपाठ नेतृत्व हभप जगन महाराज गिरी तसेच शाहूनगर व विठ्ठल मंदिर महिला भजनी मंडळ करणार आहेत .
यामध्ये हभप ओमकार महाराज टेकाळे ,हभप राजेभाऊ महाराज हिस्सीकर ,हभप कु ऐश्वर्या टेकाळे ,हभप आशाताई जावडे ,हभप अशोकानंद सावरगाव कर,हभप बापूसाहेब महाराज खवनेब,हभप मारोती महाराज वाघ हे सेवा देणार आहेत .तर दि २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप प्रसाद महाराज काष्टे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे .
व दुपारी १२ ते ५ यावेळेत नगरसेवक दिपकभाऊ कोल्हाळ यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्रीमद भागवत कथा श्रवणाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
Shabdraj www.shabdraj.com