16/10/26
Breaking News

वालूरच्या मराठी शाळेत आनंदनगरी

चिमुकल्यांनी घेतले व्यवहारज्ञानाचे धडे

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी आनंदनगरी साकारली गेली.

या उपक्रमात पहिले ते पाचवीच्या चिमुकल्या मुला-मुलांनी स्वतः अनेक पदार्थ बनवून आपली छोटी दुकाने थाटामाटात मांडली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारातील गणिती हिशोब आणि वास्तविक जीवन यांचा मेळ कसा लावायचा, याचा प्रात्यक्षिकातून अनुभव देणे हा होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने खरेदी-विक्रीचा आनंद घेत गणिताचे आणि व्यावहारिक शिक्षणाचे धडे गिरवले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक गोविंद चाटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अयोध्या रोकडे, उपाध्यक्ष तुळशीराम ढवळे आणि माणिकराव मिनगिने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक किरण गिलडा, रामेश्वर गिते, स्वाती हेलसकर आणि लीना ढवळे आदींनी पुढाकार घेतला.

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …