17/07/26
Breaking News

सेलूत स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

सेलू ( नारायण पाटील )
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ,अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल,सेलू यांच्या वतीने आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म.छत्रपती संभाजीनगर प्रायोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन दि २३ व २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेले आहे .

येथील नूतन विद्यालयाच्या रा .ब .गिलडा सभागृहात आयोजित या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प “समग्र ज्ञानेश्वर माऊली ” या विषयावर निवृत्त जिल्हाधिकारी व ज्ञानेश्वरी चे गाढे अभ्यासक मा. विजयकुमार फड हे गुंफणार असून अध्यक्षपदी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ,अंबाजोगाई चे कार्यवाह मा . डॉ .हेमंत वैद्य हे राहणार आहेत .
दि २४ फेब्रुवारी रोजी दुसरे पुष्प ” संघ शताब्दी – कार्य आणि जबाबदारी ” या विषयावर खोलेश्वर महाविद्यालयातील पूर्व इतिहास प्रमुख तथा भा. शी. प्र.अंबाजोगाई चे माजी कार्यवाह मा .शरदराव हेबाळकर हे गुंफणार आहेत .यावेळी देवगिरी नागरी सहकारी बँक ली .छत्रपती संभाजीनगर चे अध्यक्ष मा .किशोरजी शितोळे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत .
या व्याख्यानमालेचे हे १४ वर्ष असून अनेक नामवंत विचारवतांनी यामध्ये आतापर्यंत मौलिक विचार व्यक्त केले आहेत .यामुळे या व्याख्यानमालेला एक आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे . या माध्यमातून नामवंत वक्त्यांचे विचार आत्मसात करण्यात येत असल्यामुळे श्रोते देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात .
यसवर्षी माऊलीचे ७५० वे सप्तजन्मशताब्दी वर्ष तसेच संघाचे शताब्दी वर्ष असल्यामुळे त्या अनुषंगानेच व्याख्यानमालेच्या विषयाची निवड करण्यात आली आहे .तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेस उपस्थित राहावे .असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …