09/05/26
Breaking News

पाथरीतील अक्षय कॉम्प्युटर्सला पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे एम.के.सी.एल.कडून विभागीय सन्मान

पाथरी / प्रतिनिधी – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) तर्फे आयोजित विभागीय कार्यक्रमात अक्षय कंप्युटर, पाथरी (सेंटर क्र. 15210137) या संस्थेला “Best Practices & Last Five Years Continued Performance” या श्रेणीत Certificate of Appreciation देऊन सन्मानित करण्यात आले.

 

०४ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक तुकाराम पौळ सर व सौ.शिवकण्या पौळ यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी MKCL चे वरिष्ठ अधिकारी समीरजी पांडे,अतुल पतोडी, अमित रानडे,महेश पत्रिके,सिद्धार्थ पाटील,कोशल ओव्हळ,जिवन लेंभे,अमर देवडे व विविध जिल्ह्यांतील केंद्र प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

 

अक्षय कंप्युटरने गेल्या पाच वर्षांपासून MS-CIT व KLiC कोर्सेसमध्ये शिस्तबद्ध कार्यपद्धती, विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सुलभता, गुणवत्तापूर्ण अध्यापन, वेळेचे नियोजन व सातत्याने विद्यार्थ्यांना उत्तम निकाल देण्याचे कार्य केले आहे.

 

या यशाबद्दल तुकाराम पौळ सर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या परिश्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विश्वासाचे फलित आहे. येणाऱ्या काळातही आम्ही नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्रसारासाठी कार्यरत राहू.”

 

या पुरस्कारामुळे पाथरीसह संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानाची नोंद झाली आहे.माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब काका टेंगसे व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व विद्यार्थी-पालकांनी पौळ सरांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …