04/02/26
Breaking News

पालम येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक संपन्न

पालम,दि 01 (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा पालम यांच्यावतीने चक्रधर वाचनालयाच्या सभागृहात जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 डिसेंबर सोमवार रोजी बैठक संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे यांनी बैठकीत मागील केलेल्या कामाचा आढावा सादर केला.
या बैठकीत परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांनी उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला. यानंतर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचा वाटप करण्यात आले.
यावेळी बैठकीला मार्गदर्शनात स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांनी ग्राहकांची हित लक्षात घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापना, उद्देश व ग्राहकांच्या हितासाठी केंद्र शासनाला कायदा तयार करण्यास भाग पाडले. ग्राहकांच्या हितासाठी व संरक्षणाकरिता कायद्या आणावे मिळालेले सहा हक्क सांगून कोणतीही संघटना चळवळ ही कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालते.
त्यासाठी वेळोवेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका नियमित होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी सांगितले.
बैठकीचे आभार प्रदर्शन पालम शहराध्यक्ष धोंडीराम कळंबे यांनी मानले.
बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …