सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील गोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री धामनगावे जे ए सर व श्री बोरगांवकर जी आर सर यांची गोहेगाव शाळेतून अचानक बदली झाली व त्यांच्याजागी नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री दिवटे सर हे मनोरुग्ण आहेत व श्री भांडे सर हे मध्यपान करुन शाळेत आल्यामुळे त्यांचा विरोध करत शाळेवर विद्यार्थ्यासह सर्व गावकरी यांनी दि.09/09/2025 वार मंगळवार रोजी पासून बहिष्कार टाकला आहे.
नवीन रुजू झालेले शिक्षक यांची गोहेगाव शाळेतून जो पर्यंत त्यांची बदली करण्यात येत नाही व पुन्हा एकदा श्री धामणगावे सर आणि श्री बोरगावकर सर यांची पुननियुक्ती गोहेगाव शाळेत होत नाही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यासह शालेय शिक्षण समिती, ग्रामपंचायत,पालक व सर्व गावकरी यांनी शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे तसेच येत्या पाच दिवसात नवीन नियुक्ती शिक्षक त्यांची बदली न झाल्यास व जुनेच शिक्षक अगोदरचे न दिल्यास सेलू येथील तहसील कार्यालया समोर विद्यार्थ्यासह आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन आज गोहेगाव येथे श्री गजानन वाघमारे साहेब (उपशिक्षण अधिकारी परभणी) तसेच श्री मनोज चव्हाण साहेब (गटशिक्षण अधिकारी सेलू) व रवळगाव येथील केंद्रप्रमुख नूर शेख सर हे आले असता त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.मागील तीन दिवसापासून एकही विद्यार्थी शाळेत आला नाही.विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने वेळेत कार्यवाही करून गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती केली आहे.
Shabdraj www.shabdraj.com