16/10/26
Breaking News

विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! विज्ञान वारी जिल्हास्तरीय साठी निवड

सेलू (प्रतिनिधी):
परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत सेलू येथील विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.

गौरांग निलेश पाटील व प्रणव विठ्ठल सुरवसे यांची या विज्ञानवारी साठी निवड करण्यात आली असून त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलात होणार आहे. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान नोंदणी असून, १० वाजल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे.

या यशाबद्दल विवेकानंद विद्यालयाचे स्थानिक समिती अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,कार्यवाह उपेंद्र बेलूरकर ,मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे ,अनिल कौसडीकर यांनी संस्थेत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी संस्थेतील शिक्षक व शिक्षिकेची देखील उपस्थिती होती.त्यांनी देखील दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

Check Also

हिंगोलीच्या खेळाडूंची सुवर्णभरारी!तायक्वांदोमध्ये पाच सुवर्ण व सहा रौप्य

हिंगोली,दि 11  परभणी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या …