17/07/26
Breaking News

मराठे हिंदू नाहीयेत का? मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदू-मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठे हिंदू नाहीयेत का? जर जातचं संपली, तर मग धर्म कसा टिकवायचा? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते.
देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागले आहेत. आमचा काही लॉस नाही पण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी सावध होणं गरजेचे आहे. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे, मुद्दाम मराठा अधिकारी संपवण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्या नगरमध्ये बोलताना केला आहे.

ओबीसी पालकमंत्री मराठा आमदारांना त्रास देतात
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीचे जिथे मंत्री केले आहेत ते भाजप च्याच मराठा आमदारांना त्रास देत आहे, अशी परिस्थिती जालन्यात दिसून येत आहे. अशाने कसा पक्ष वाढणार, पक्षातील लोक नाराज होत आहेत. ओबीसी मंत्री झाले तिथे मराठा आमदारांना त्रास देत आहेत. आमचे मराठा पालकमंत्री कुणाला त्रास देतात का? मला सत्ताधारी 30 ते 32 आमदार-खासदारांचे फोन आले.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …