परभणी,दि.11(प्रतिनिधी) : तालुक्यातील झरी या गावाजवळ अज्ञात चोरट्यांनी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून एका आखाड्यावरुन महिलांच्या अंगावरील दागदागिणे लंपास केले. तसेच मोटारसायकलही पळवली.
जिंतूर ते झरी या रस्त्यालगत अनिल वटारे यांचे गट नंबर 1014 या क्षेत्रातील शेतात आखाडा आहे. गुरुवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास तीघा चोरट्यांनी आखाड्यावर येऊन गड्यास मारहाण केली. महिलांना शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून 4 ग्रॅम सोन्याची पोत,3 ग्रॅम कानातील कुडके, 5 तोळ्याचे पायातील जोडवे तर 5 ग्रॅम कानातील झुंबर हिसकावून घेतले. तर भारत गुहाळे यांच्या गळ्यातील दीड ग्रॅम सोन्याची चैनही लंपास केली. या चोरट्यांनी निघतेवेळी एम.एच. 21 ए.एफ. 4702 या क्रमांकाची मोटारसायकलसुध्दा पळवली. चोरट्यांनी निघतेवेळी सर्वांना खोलीत कोंडून बाहेरुन कडी लावली. मॉर्निंग वॉकला जाणार्या काही ग्रामस्थांना ही बाब लक्षात आल्यानंतर कडी काढली तेव्हा तो प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, याच आखाड्यावर एक वर्षांपूर्वीच सोयाबीनचे 38 कट्टे चोरट्यांनी गायब केले होते. दरम्यान, या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
Shabdraj www.shabdraj.com