04/02/26
Breaking News

विभागीय पोस्टर स्पर्धेत कलाशिक्षक संतोष ताल्डे प्रथम

सेलू ( प्रतिनिधी )
राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे. यांच्यावतीने शिक्षकांसाठी विविध विभागीय स्पर्धांचे आयोजन 2६ डिसेंबर शुक्रवार रोजी करण्यात आले होते. शिक्षण संचालक राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून शिक्षक व अधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी ४२विविध विभागीय स्पर्धां महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सध्या सुरू आहेत. संभाजीनगर विभागातील ही स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी. (डायट) येथे विभागीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली व परभणी अशा पाच जिल्ह्यातून एकूण २३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत नितीन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बाहेर बोरगाव येथील कलाशिक्षक श्री संतोष ताल्डे यांनी “आत्मनिर्भर भारत” या विषयावर पोस्टर रेखाटले होते. त्यांच्या कलाकृतीला “प्रथम पारितोषिक” मिळाले. आणि या कलाकृतीची निवड जानेवारीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यावेळी डायटचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, ज्येष्ठ व्याख्याते गणेश शिंदे तसेच परीक्षक केशव लगड, जाधव, वाघ यांनी कलाशिक्षक श्री संतोष ताल्डे यांनी दैदीप्यमान यश संपादन केल्या बद्दल. त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख मुपडे सर, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …