पूर्णा / प्रतिनिधी – पूर्णा शहरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त स्वातंत्र्य सैनिक (कै) दाजी साहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला. पूर्णा येथील नवा मोंढा मैदानावरून तालुक्यातील विविध वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ त्याच बरोबर विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अध्यात्मिक देखावे, विविध पथक, पारंपारिक वेशभूषेतील भाविकांसह पालखी व दिंडी …
Read More »Shabdraj
संत जनाबाई व संत मोतिराम महाराज समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
गंगाखेड / प्रतिनिधी :- आज आषाढी एकादशी निमित्ताने संत भक्तांमध्ये विशेष उत्साह पहावयास मिळाला. श्री संत जनाबाई यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. पहाटेपासूनच भक्तजन अभिषेक, पूजा व हरिपाठ करत दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होते. पहाटे रेखा गुट्टे यांनी विठ्ठल रखुमाई व संत जनाबाई समाधी चे अभिषेक केला ह्या वेळी डॉ दीनकर मुंडे यांच्या सह संस्था चालक उपस्थित होते. …
Read More »प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करावे – ओमप्रकाश यादव
परभणी – बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले. शुक्रवार दि. 04 जुलै 2025 रोजी पाथरी तालुक्यातील वडी या ग्रामपंचायती मध्ये माझं गाव माझं योगदान उपक्रमांतर्गत गावकऱ्यांच्या लोकसहभागातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या सरपंच सौ सुशीलाताई खंडागळे, …
Read More »अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश
परभणी,दि 05 ः राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे. सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे …
Read More »आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला-उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव …
Read More »महत्त्वाची बातमी… शाळांना दोन दिवस सुट्टी…
: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे (Maharashtra school holidays). या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य …
Read More »हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा
: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …
Read More »गुणपत्रिकेतील गुणासोबतच विद्यार्थी संस्कारक्षम झाला पाहिजे – टि. के. कुलकर्णी
सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्नशील राहावे व सर्वांशी माणूसकीने वागावे. प्रगतीपुस्तकावरील गुणासोबतच अंगातील सदगुण देखील तेवढेच महत्वाचे आहेत .त्यासाठी गुणवत्तेसोबच विद्यार्थी संस्कारक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .असे विचार निवृत्त वनाधिकारी टी के कुलकर्णी यांनी नूतन संस्थेच्या वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त …
Read More »साधकाच्या अंतःकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ- नंदकुमार महाराज गोंदीकर
सेलू / प्रतिनिधी – साधकांच्या अंतकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ असून भगवंताच्या मुखातून जागृत अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे . व जीवनातील व्यथा निवारण करणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित येथील शिष्य परिवाराच्या वतीने दत्त मंदिर मध्ये आयोजित भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्यात …
Read More »पाथरी येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
पाथरी,दि 03 (प्रतिनिधी)ः शहरातील शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे बुधवार दिनांक 2 जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अजिंक्य नखाते हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत जपून केला पाहिजे असे आवाहन …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com