23/06/26
Breaking News

अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 05 ः
राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे.
सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे सहभागी झाली होती. या खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ.संतोष कोकीळ, प्रा.राजेसाहेब रेंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाशराव सोळंके, सरचिटणीस आमदार सतीशराव चव्हाण, महाविद्यालय विकास समिती प्रमुख हेमंतराव जामकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर तसेच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

डिग्रस फाटा दाटेगाव रस्ता व पुलाचे काम सुरू

हिंगोली,दि 23  हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा ते दाटेगाव रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते हा रस्ता …