24/03/26
Breaking News

Shabdraj

लाडकी बहीण योजनेतून तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? पहा

महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विविध राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. २०२४ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे. आतापर्यंत या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही. सध्या सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. त्यानुसार यादीतून नावे …

Read More »

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा

परभणी,दि 08 ः अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकास व मदतनीस महासंघाने परभणीच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मंगळवारी जोरदार मोर्चा काढला. अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्यूटी मिळविण्यास पात्र आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी निर्णय दिला. परंतु, त्या बाबीची राज्य सरकारने अद्यापपर्यंत अंमलबजावनी केली नाही, अशी खंत या मोर्चेकर्‍यांनी जिल्हा महसूल व जिल्हा …

Read More »

सचिन जोशी यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान

परभणी,दि 08 (प्रतिनिधी)ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री …

Read More »

सावधान.. एक चूक आणि अकाउंट रिकामं, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट

तुम्हाला जर तुमच्या घरातून किंवा जवळच्या व्यक्तीचा अथवा मित्र मैत्रिणीचा फोन आला, मी संकटात आहे मला मदत कर, पैशांची खूप गरज आहे, लगेच पाठवू शकतेस का असं सांगणारा, तर तुम्ही एकदम घाबरून जाल, पटकन तिला मदत करण्यासाठी म्हणून पैसे पाठवायला जाल, पण थांबा, तुमची हीच चू महागात पडू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरच्यांना खरंच पैशांची गरज आहे का हे …

Read More »

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या छात्रसेनेचे यश

परभणी (८)५२-महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडच्या वतीने किनवट येथे आयोजित केलेल्या शिबिरात श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कडेट्सनी ड्रिल,मैदानी स्पर्धा, फायरिंग तसेच सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्ण, रजत तसेच कांस्य अशा २० पदकांची लयलूट करून महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांच्या निदर्शनाखाली पार पडलेल्या सदरील शिबिरात ४५० हुन अधिक कॅडेट्सने सहभाग घेतला होता. यात महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या …

Read More »

चकवाचांदण हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे- माणिक पुरी

परभणी,दि 06 ः “चकवाचांदण हे केवळ आत्मचरित्र नाही, तर अरण्याच्या गूढतेचा, निसर्गाच्या अद्भुततेचा आणि संशोधनाच्या अथक झगड्याचा भाषिक आविष्कार आहे. हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे,” अशा प्रभावी शब्दांत साहित्यिक माणिक पुरी यांनी मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा सखोल परामर्श घेतला. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी आयोजित ‘… आणि ग्रंथोपजीवीये’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत “एक दिवस : एक पुस्तक” या मालिकेतील पहिले पुष्प …

Read More »

समाधान शिबिरात नागरिकांना विविध योजनांचा लाभ

पाथरी (प्रतिनिधी) : पंचायत समिती पाथरीच्या सभागृहात तालुकास्तरीय समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्री.एस.एन.हांदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विस्तार अधिकारी संदीपान घुंबरे हे होते.प्रमुख उपस्थिती सांख्यिकी विस्तार अधिकारी  सुमित वाघमारे,पेशकार श्रीमती परदेशी,ग्राम महसूल अधिकारी संदीप बडगुजर,सय्यद साजेद,राहुल सानप,गजानन घांडगे,कृषी विभागाचे श्री.उगले,महा ई-सेवा आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक तुकाराम पौळ,रवी मांगुळकर,भागवत उगले तसेच अन्य …

Read More »

साहित्यिक – कलावंतांना मिळणार मानधन..करा ऑनलाईन अर्ज

परभणी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजने अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य सेवेचा गौरव करणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता व अटी :- अर्जदाराचे वय …

Read More »

गंगाखेड तालुक्यातील तब्बल ४१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द

आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंचा ‘लक्षवेधी’ दणका : सहकार विभागाची कडक कारवाई गंगाखेड (प्रतिनिधी) :- स्थानिक राजकारण आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी बोगस व नियमबाह्य पध्दतीने स्थापन करण्यात आलेल्या सर्वविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी ‘लक्षवेधी’ मागणी स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी २० मार्च २०२५ रोजी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. …

Read More »

शिष्यवृत्ती योजना लॉन्च, कॉलेज-विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार 20,000 पर्यंत आर्थिक मदत

पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) कडून २०,००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. सीबीएसईने ही खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड यूनिव्हर्सिटी स्टूडेंट्स (CSSS) आहे. काय आहे योजना सीबीएसईने एक नोटीस दिली आहे. त्यानुसार महाविद्यालय, विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी …

Read More »