04/02/26
Breaking News

बाबाशेठ पटेल व नंदु पटेल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

 रामप्रसाद ओझा,
गंगाखेड,दि 11 ः
गंगाखेड शहरातील सामाजिक कार्य आणि लोकसहभागाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे  फजलोद्दीन पटेल (बाबा शेठ) यांनी औपचारिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याच कार्यक्रमात रासपा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार (नंदू) पटेल,माजी नगरसेवक राजू पटेल तसेच अजमत खान (अज्जू भाई) यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.कार्यक्रमास माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे व ॲड. मिथिलेश केंद्रे प्रमुख उपस्थित होते.

…प्रभाग ३ साठी उमेदवारीची घोषणा…
या प्रसंगी प्रभाग क्र. ३ (OBC) महिला राखीव जागेसाठी
सौ. महेविश फजलोद्दीन पटेल यांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
यामुळे प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षम स्थितीत आल्याची स्पष्ट राजकीय हवा तयार झाली आहे.

…नंदू पटेल यांच्या प्रवेशाने शहरात नवीन समीकरण…
नंदकुमार पटेल यांनी २०१६ च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वतःच्या ताकदीवर सुमारे चार हजार निर्णायक मते प्राप्त केली होती.त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ऊर्जितावस्था लाभली असल्याचे पक्ष नेतृत्वाचे मत आहे.
…..बाबाशेठ पटेल – लोकविश्वासाचे प्रतीक…
बाबाशेठ पटेल यांनी शहरातील प्रत्येक घटकांमध्ये दिलखुलास व जवळिक निर्माण केली आहे.
अडचणीतील कुटुंबांना तत्पर मदत करण्याची त्यांची वृत्ती सर्वपरिचित आहे.
विशेषतः पोलीस विभागासमवेत विश्वासाचे संबंध प्रस्थापित करून त्यांनी ‘पोलिस मित्र’ म्हणून एक वेगळी सामाजिक प्रतिमा निर्माण केली आहे.त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग १, २ व ७ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना थेट बळ मिळेल, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुनिल चौधरी, शेख मुस्तफा, सलीम बागवान, अन्वर खान, बबनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवसंजीवनी फुंकणारा असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातून व्यक्त झाली.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …