गंगाखेड/परभणी (प्रतिनिधी)
सनातन रक्षा दल केंद्रीय कार्यालय नवी दिल्ली संपूर्ण देशभर सनातन धर्माचे रक्षा करणे सनातन धर्माचे उपक्रम राबविणे ही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश मंत्री शंकरराव लोखंडे पंढरपूर यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष नीरज भाई मिश्रा यांनी परभणी जिल्हाध्यक्षपदी सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे व्यंकटेश उर्फ बाळासाहेब राखे यांची परभणी सनातन रक्षा दल जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करून निवडीचे पत्र दिले.
गेल्या अनेक वर्षापासून श्री राखे हे सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. तसेच उत्कृष्ट संघटक आहेत. या कार्याची दखल घेत राष्ट्रीय सनातन रक्षक दल नवी दिल्ली यांनी परभणी जिल्ह्याच्या सनातन रक्षक दलाच्या जिल्हाध्यक्षपदी राखे यांची निवड नियुक्ती करण्यात आली.
, या नियुक्तीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये सनातन रक्षा दिलच्या शाखा स्थापना करून सनातन धर्माविषयी जनजागृती, संघटन संघटनेचे ध्येय उद्दिष्ट अंमलबजावणी करण्याची नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या निवडीबद्दल विष्णू मुरकुटे, अंकुश मदनवाढ, शशी धोंडारकर , बाळासाहेब लोखंडे , मल्लिकार्जुन सौंदळे सोनपेठ, शंकर अजेगावकर, गुलाबराव हरकळ, दिगंबर मोरे, यांच्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे
Shabdraj www.shabdraj.com