04/02/26
Breaking News

विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज-एकनाथ जाधव

सेलू/प्रतिनिधी – विज्ञानाच्या शक्तीची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे,बालपणापासूनच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी .वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होतो त्यासाठी विज्ञाननिष्ठ होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले.

 

अखिल भारतीय विज्ञान मेळावा अंतर्गत शिक्षण विभाग (पं.स.सेलू ) विवेकानंद प्राथमिक विद्यालय आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ( दि.१३ऑगस्ट,बुधवार) रोजी विवेकानंद विद्यालयात उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे ,गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आली.’क्वांटम युगाची सुरुवात संभ्याव्यता व आव्हाने’ हा स्पर्धेचा विषय होता.

व्यासपीठावर अध्यक्ष म्हणुन विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शंकर शितोळे ,केंद्रप्रमुख एकनाथ जाधव ,तालुका विज्ञान प्रमुख ए. व्ही.पद्माकर ,पर्यवेक्षक म्हणुन शांताबाई नखाते ज्युनियर कॉलेज वालुर येथील भगवान पल्लेवाड , जि.प.प्राथमिक शाळा म्हाळसापूर येथील विज्ञान पदवीधर आम्रपाली खाजेकर ,नूतन महाविद्यालयाचे विजय चौधरी यांनी काम पाहिले. कु.हर्षदा नीळकंठ काष्टे (ज्ञानतीर्थ विद्यालय ,सेलू -प्रथम क्रमांक ),कु.दिव्या गणेश भागवत (जि. प.शाळा गुगळीधामणगाव – द्वितीय क्रमांक ) ,आयेशा मो.अनिस शेख (व्हिजन इंग्लिश स्कुल, सेलू -तृतीय क्रमांक ) या विद्यार्थिनींचा क्रमांक आला.

तालुक्यातील १४ शाळांचे विद्यार्थी सहभागी होते.सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी रागिणी जकाते , स्वप्नाली देवडे यांनी प्रयत्न केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …