18/07/26
Breaking News

मोठी बातमी… शरद पवारांची तब्येत बिघडली………….

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जाणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. त्यानंतर आता त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले होते. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर सातत्याने त्यांची दगदग सुरू आहे. गत काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. यामु्ळे त्यांनी आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली नाही. त्यांनी घरी राहूनच आराम करणे पसंत केले. पण प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नसल्यामुळे अखेर त्यांना तातडीने पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात येत आहे. शरद पवारांच्या ताफ्यात एक कार्डियाक रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली आहे.

Check Also

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर …