04/02/26
Breaking News

8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट..पगार कधी अन् किती

नवी दिल्ली : देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहेबराच काळ पगारपेन्शन आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार कायाबाबत चर्चा सुरू होतीआता आयोगाचे अधिकृत नियुक्ती झाल्याने येत्या काही वर्षांत सरकारी वेतन रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहेमात्र नेमकी वाढ किती होणार आणि ती कधी लागू होणारहे अद्याप ठरलेले नाही.

8व्या केंद्रीय वेतन आयोगाचा थेट फायदा 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 69 लाख पेन्शनधारकांना होणार आहेम्हणजेच देशातील मोठ्या लोकसंख्येच्या उत्पन्नावर याचा थेट परिणाम होईलसध्या लागू असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहेत्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अपेक्षा आहे की नवीन वेतनरचना वेळेत लागू केली जाईलसरकारी संकेतांनुसारसुधारित वेतन आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाऊ शकते.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली की 8व्या वेतन आयोगाचे गठन 3 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहेया आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजन प्रभा देसाई आहेतप्रोपुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणूनतर पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेआयोगाला आपला अहवाल तयार करण्यासाठी सुमारे 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असूनत्यामुळे त्याचा अहवाल 2027 च्या आसपास सादर होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईलहे मुख्यतः फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहेफिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगार आणि पेन्शनवर लावला जाणारा गुणक. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 च्या आसपास ठेवण्यात आलातर अनेक कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार दुप्पट किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. याचा परिणाम केवळ पगारावरच नाहीतर HRA, पेन्शन आणि इतर भत्त्यांवरही होणार आहे.
गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) बेसिकमध्ये विलीन केला जाईलअशी चर्चा जोरात होती. मात्रवित्त मंत्रालयाने यावर स्पष्ट भूमिका घेतली असून सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगितले आहे. DA आणि DR पूर्वीप्रमाणेच दर सहा महिन्यांनी AICPI-IW निर्देशांकाच्या आधारे वाढवले जात राहतीलत्यामुळे या विषयावर पसरलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

Check Also

डिसेंबरमध्ये राहणार बँका एवढ्या .. दिवस बंद राहणार

2025 मधील शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. विविध राज्यातील सण आणि उत्सवांच्या निमित्तानं बँका त्या …