04/02/26
Breaking News

शारदा महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

परभणी : येथील शारदा महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, डॉ. भगवान पाटील व सुरेश जयपूरकर यांची विचार मंचावर उपस्थिती होती. प्रथमत: महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला नव्हे तर जगाला शांततेचा व अहिंसेचा संदेश दिला. तर लालबहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते, जय जवान जय किसान हा नारा त्यांनी दिला. लालबहादूर शास्त्री म्हणजे मूर्ती लहान आणि कृती महान असे त्यांचे एक आदर्श व्यक्तिमत्व होते.
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉ. भगवान पाटील म्हणाले महात्मा गांधी यांनी जीवनाचा संपूर्ण त्याग करून राष्ट्रासाठी सेवा अर्पण केले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले तर डॉ. संतोष नाकाडे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री दोन्ही महापुरुषांच्या कार्य समाजासाठी उपयुक्त आहे हे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अविनाश पांचाळ तर आभार सुरेश जयपुरकर यांनी केले, या कार्यक्रमाला उपस्थित डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ प्रशांत मेने, डॉ. रमेश भालेराव, डॉ. हनुमंत शेवाळे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.पी.देशपांडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.अविनाश पांचाळ यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम मूत्रटकर व तनुजा रासवे यांनी प्रयत्न केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …