04/02/26
Breaking News

भाजपा नेते विलास बाबर राष्ट्रवादीत… पोखर्णी जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल

परभणी,दि.21(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांनी बुधवार 21 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्याने भाजपास सोडचिठ्ठी दिली अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पोखर्णी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
पोखर्णी या गटातून आपणास उमेदवारी जाहीर केली जाईल, एबी फॉर्मही दिला जाईल, असे भाजपाच्या श्रेष्ठींनी नमूद केले होते. त्यामुळे ते दुपारी 1 वाजेपर्यंत एबी फॉर्मच्या प्रतिक्षेत होते. परंतु, ऐनवेळी भाजपाने बाबर यांना उमेदवारी नाकारली. तेव्हा संतप्त बाबर यांनी भाजपास सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पोखर्णी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

…सुरेश वरपुडकर यांच्यावर आरोप….
दरम्यान, शब्दराज प्रतिनिधीशी बोलतांना बाबर यांनी सांगितले की आपण गेल्या दहा वर्षांपासून या गटात इनामे इतबारे काम करीत आहोत. ग्रामीण भागात भाजपाचे काम नसतांना उत्तमरीत्या संघटनात्मक बांधणी केली. परंतु, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी भाजपात प्रवेश केल्या पाठोपाठ आपल्यासारख्या चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यास स्पष्टपणे उमेदवारी नाकारली. अन् नव्याने पदार्पण केलेल्या उमेदवारास उमेदवारी बहाल केली. वरपुडकर यांची भाजपात सुध्दा काँग्रेसची विचारसरणीच सुरु आहे. घराणेशाहीच सुरु आहे. त्यामुळे आपण त्या विचारसरणीस, घराणेशाहीस कंटाळून भाजपास जय श्रीराम केला, असे ते म्हणाले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …