परभणी,दि 31 ः
भारतीय जनता पक्ष परभणी महानगरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ३१ जुलै रोजी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत परभणी महानगर जिल्ह्याचा संघटनात्मक कार्य अहवाल सादर करण्यात आला.
या बैठकीत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी बुथ समिती, मंडळ समिती, शक्ती केंद्र प्रमुख तसेच प्रस्तावित जिल्हा कार्यकारिणीची सविस्तर माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्रजी चव्हाण यांच्यासमोर मांडली.
या सादरीकरणानंतर मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी भाजपा परभणी महानगर जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.
ही कार्यकारिणी पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com