04/02/26
Breaking News

भाजपा परभणी महानगरच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : ४६५ रक्तदात्यांचा सहभाग

परभणी,दि 22 ः
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास परभणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ४६५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.
परभणी महानगर अंतर्गत कौस्तुभ मंगल कार्यालय, परभणी (चिंतामणी मंदिर मंडळ), मारुती मंदिर, असोला (परभणी ग्रामीण मंडळ) देशपांडे हॉस्पिटल, क्रांती चौक, परभणी (खंडोबा मंदिर मंडळ) ज्ञानेश्वर माऊली मंदिर, विद्यानगर, परभणी (पारदेश्वर मंदिर मंडळ) खंडोबा मंदिर, खंडोबा बाजार, परभणी (खंडोबा मंदिर मंडळ) उड्डाणपूल खाली, भीमनगर, परभणी (रोकड हनुमान मंदिर मंडळ) झरी, सरकारी दवाखान्याच्या बाजूस (परभणी ग्रामीण मंडळ) अशा ७ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमाचे नेतृत्व भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष  शिवाजी भरोसे यांनी केले. विविध मंडळांमार्फत झालेल्या या आयोजनात लोक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले.हा उपक्रम परभणी महानगरातील रक्तदात्यांच्या सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.
यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे, पारदेश्वर मंडळाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर, ग्रामीण मंडळाध्यक्ष दैवत लाटे, रोकड हनुमान मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी, चिंतामणी मंडळाध्यक्ष ऋतुजा जोशी, खंडोबा मंडळाध्यक्ष सुरज चोपडे, आसोला सरपंच उमाकांत भरोसे, माजी मंडळाध्यक्ष संतोष जाधव, यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, झरीचे सरपंच दिलीपराव देशमुख, डॉ प्रमोद देशमुख भाजपाचे पदाधिकारी डॉ. केदार खटींग, भीमराव वायवळ, सुनील देशमुख, मंगलताई मुदगलकर, डॉ. दिनेश कांबळे, मधुकर गव्हाणे, संजय शेळके, रितेश जैन, चंद्रकांत डहाळे, मोहन कुलकर्णी, शंकर आजेगावकर, हम्मु चाऊस, सिकंदर खान, प्रविण गायकवाड, शिवप्रसाद लोखंडे, भालचंद्र गोरे, अतीक पटेल, संतोष चौधरी, उमेश शेळके, डॉ. मनोज पोरवाल, रमा शेजावळे, प्रभावती अन्नपूर्वे, रुपाली ठाकरे, मनीषा जाधव, गोविंद रायमले, अक्षय डहाळे, ओम मुदिराज, राजेश बालटकर, आनंद यलगंदवार, रावसाहेब हनवते, श्रेयस रायमले, सचिन साखरे, सुशांत साखरे, डॉ. प्रियंका अंभोरे ,डॉ, नूतन देशमुख , कुलकर्णी सर, गायकवाड सर, मोरे सर, दिनेश बिरगड ,नारायण जगाडे ,अडकिने मॅडम, बोबडे मॅडम ,केंद्र मॅडम, पंकज खेडकर, सखा पाटील ,गजानन जगाडे , ओंकार देशमुख, भास्कर जगाडे ,संतोष देशमुख ,अनिल सावंत ,प्रशांत देशमुख, कैलास रगडे ,गौतम ढाले, समीर खतीब ,डी एम जगाडे ,दत्ता चौधरी, विष्णू पारदे, उत्तमराव देवडे ,लक्ष्मण चट्टे ,गणेश बल्लाळ, दत्ता जगाडे ,पंढरी बारहाते ,रमेशराव तरवटे, माऊली मंदिराचे अध्यक्ष औंढेकर सर, डॉ. अशोक शेलगावकर, डॉ. नरेंद्र ब्रह्मपुरीकर, बाळासाहेब जाधव, मोहन कुलकर्णी, प्रदीप तांदळे, विश्वास कराळे पाटील, रोहित जगदाळे, संजय कुलकर्णी, गणेश जाधव, विलास लुबाळे, संकेत मठपती, अथर्व सबनीस, माणिक पवार, निलेश बागलकोटकर, अभिजीत दशरथे, योगेश जोशी सोनपेठकर, फालाजी रेंगे, सुशील शर्मा, मकरंद मांडे, किशोर शर्मा, दिनेश नरवाडकर, सुप्रियाताई मांडे, सुप्रियाताई कुलकर्णी, अर्चनाताई जैन, कविताताई लहाने, डॉ. विनोद नन्नवरे, योगेश पिंपळगावकर, विकास देशमुख, रोहित वाघमारे, ऋषिकेश बारवकर, अनिल रेंगे, आशिष गिरी, हनुमंत सोमवंशी, कैलास टेहरे, विकास देशमुख, निलेश चौधरी, महेश देशमुख, रोहित परसोडे, विजय गायकवाड, मोहम्मद गौस, अक्षय डहाळे, माऊली कोपरे, बालाजी नागेश्वर, महेश जोशी, दीपक गवारे, अशोक नेटके, भैय्यासाहेब काळे, शंतनु सुभेदार, खुर्शिद खान, सिकंदर खान, हमु चाऊस, अभिषेक घंटी, लक्ष्मीकांत कहात मोरे, अनिरुद्ध काळे, ॲड. सुरेश शिंदे, दिनेश नरवाडकर, वैभव शिंदे, संदीप शिंदे, अतुल लंगोटे, दिलिप गिराम, अजिंक्य गोंडसवार , लक्ष्मीकांत क्षीरसागर, किसन सिंग टाक, शुभम सपकाळ, सुरेश पांचाळ, जिजा थोरात, बाळासाहेब शिंदे, राज निलावार, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले होते.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …