25/06/26
Breaking News

हिंगोलीत भाजपच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन

हिंगोली (प्रतिनिधी):
भारतीय जनता पक्षाच्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६’ अंतर्गत हिंगोली जिल्हास्तरीय दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी शहरातील हॉटेल शांती येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
‘समर्थ कार्यकर्ता, सशक्त संघटना’ ही संकल्पना घेऊन आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी प्रसार करणे या दोन दिवसांत विविध सत्रांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक प्रशिक्षण दिले जात आहे.
या कार्यशाळेत प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, विधान परिषद सदस्य प्रा.संजय भेंडे आणि प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव सावजी,भाजपा नेते रेणुकादास देशमुख,प्रदेश सचिव प्रविण घुगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे,आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, जिल्हा संयोजक फुलाजीराव शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, अतिश दांडेगावकर यांच्यासह जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनप्रवास, ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ विचार मांडणारे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तसेच भारतीय जनसंघापासून ते आजच्या भाजपपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह हिंगोली जिल्ह्यात झालेल्या विकासकामांच्या माहिती फलकांचेही उद्घाटन जिल्हा प्रभारी संजयभाऊ कौडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

Check Also

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या …