आजचा दिवस बॉलिवूडसाठी काळा दिवस ठरलाय. लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आज २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांची साथ कायमची सोडलीये. बॉलिवूडचा ही- मॅन प्रेक्षकांना सोडून गेलाय. ते गेले काही दिवस व्हेंटिलेटरवर देखील होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पत्नी प्रकाश कौर यांच्या सांगण्यावरून त्यांना घरी हलवण्यात आलं होतं. मात्र ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलीये. धर्मेंद्र यांच्या पार्थिव देहावर विले पार्ले येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.
काही दिवसांपूर्वीदेखील ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेव्हा फक्त त्यांना चेकअप करून पुन्हा घरी सोडण्यात आलं होतं. पुन्हा एकदा १० नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची तब्येत बरीच नाजूक असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं सांगण्यात आलेलं. त्यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यांना राहत्या घरी हलवण्यात आलं. त्यांची तब्येत पाहून त्यांच्या मुलींना देखील परदेशातून ताबडतोब बोलावून घेतलं होतं. धर्मेंद्र ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
धर्मेंद्र यांनी १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६६ मध्ये आलेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटाने त्यांना ‘अॅक्शन हिरो’ म्हणून विशेष ओळख दिली. त्यानंतर त्यांनी ‘शोले’, ‘धरम वीर’, ‘चरस’ यांसारख्या अनेक यशस्वी अॅक्शन चित्रपटांतून काम केले. च्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय चित्रपट म्हणजे ‘शोले’ (१९७५), ज्यात त्यांनी ‘वीरू’ ही भूमिका केली. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. ते आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अलीकडील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (२०२३) या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली.धर्मेंद्र यांनी राजकारणातही पाऊल ठेवले होते. ते २००४ ते २००९ या काळात राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार होते.
Shabdraj www.shabdraj.com