17/10/26
Breaking News

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान उपक्रम

हिंगोली, दि. १७ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व ८७५ शाळांमध्ये पुस्तकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शाळांमधील ग्रंथालये समृद्ध करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत राहुरी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी

शाळेला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना बाराखडी तसेच इंग्रजी व्याकरणातील काळ (टेन्सेस) यासंदर्भात प्रश्न विचारून त्यांच्या भाषिक ज्ञानाची व आकलन क्षमतेची चाचणी घेतली.

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकसहभागातून पुस्तके जमा करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभागातून शाळांची ग्रंथालये समृद्ध होण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.

Check Also

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; १६० पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे दान

हिंगोली, दि. १७  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात आणि शाळांमधील ग्रंथालये समृद्ध …