05/02/26
Breaking News

पुस्तके माणसाला समृद्ध करतात : प्राचार्य डॉ. बबन पवार

 परभणी,दि 12 ः
येथील शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्यावतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक तथा गणित तज्ञ पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अशोक चोपडे उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे व माहितीशास्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत मेने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बबन पवार यांनी डॉ. एस आर रंगनाथन यांच्या कार्यकृत्त्वावर सविस्तर प्रकाश टाकत, एस आर रंगनाथन यांनी आपल्या देशात ग्रंथालय चळवळ अत्यंत मजबूत केली. त्यांना माहीत होते की ग्रंथामुळे माणसांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे सकारात्मक बदल होतात. त्या अनुषंगाने प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. कारण पुस्तके ही माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात असे मत प्रतिपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सच्चिदानंद खडके यांनी, प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत मेने यांनी तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सहाय्यक विश्वनाथ खेडकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ.काजी कलीमोद्दीन, डॉ.एन.व्ही. सिंगापुरे, डॉ. हनुमंत शेवाळे, कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर, प्रकाश काळे,राजाराम मुत्रटकर, कु. तनुजा रासवे, संतोष एडके यांनी प्रयत्न केले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …