पाथरी / प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी चे सचिव बी जी लिपने हे नियत वयोमानाने दिनांक 31/05/2025 रोजी सेवानिवृत्त झाल्याने सचिव पद रिक्त होते. बाजार समितीचे सहाय्यक सचिव बी.एस. टेंगसे यांच्याकडे प्रभारी सचिव पदभार देण्यात आला होता बाजार समिती संचालक मंडळ सभा दि. 26/08/2025 च्या सभेत सचिव पदास मान्यतेबाबत चा ठराव सर्वानुमते घेण्यात आला होता त्यावरून मा. विकास रसाळ साहेब पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि.08/09/2025 रोजी च्या आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीच्या सचिव पदी बी. एस. टेंगसे यांना पदोन्नती स मान्यता देण्यात आली.
आज रोजी बाजार समिती संचालक मंडळ यांच्यावतीने बाजार समितीचे सभापती माननीय अनिलभाऊ नखाते, संचालक अशोकराव गिराम, गणेश दुगाने, व तसेच माधवराव जोगदंड, तुकारामजी जोगदंड, नितीन शिंदे, शिवाजीराव कुटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Shabdraj www.shabdraj.com