सेलू ( प्रतिनिधी ) येथील अखिल भारतीय सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन व विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सकाळी १० वाजता संपन्न होणाऱ्या या अभिवादन व सत्कार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून सेलू नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद सावंत हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून सेलू कृषी उत्पन्न …
Read More »मराठवाडा
वालूरच्या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
सेलू (प्रतिनिधी ) तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी) सीबीएसई पॅटर्न येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन ३ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सावित्रीच्या चिमुकल्या लेकींनी आपल्या प्रभावी कलागुणांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये ऋतुजा नवघरे, साधना ढवळे, धृती तळेकर, साक्षी खरबे, शुभांगी सारुक आणि साक्षी जायभाये या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. …
Read More »सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त केमापूर शाळेत गणित जत्रा
सेलू (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त गणित जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. गणित जत्रा हा विद्यार्थींच्या गणिती संकल्पना स्पष्ट होण्यासाठी उपयुक्त उपक्रम असल्याचे जेष्ठ शिक्षक नारायण अष्टकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना स्वतःपैसे खर्च करताना आणि विविध वस्तुंची खरेदी- विक्री करताना गणित विषयातील बेरीज, वजाबाकी, भागाकार,गुणाकार, किलो ग्रॅम आणि मापनाच्या क्रिया करत असताना …
Read More »राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे
दै. शब्दराज / गंगाखेड – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी ॲड. संतोष मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केली आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी …
Read More »वालूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
सेलू (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे वालूर (ता. सेलू) गावातील १५ वे वर्ष असून गुरुवारी (ता. १) या भव्य सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला असून ८ जानेवारी रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त १ जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद्भागवत कथा व विविध धार्मिक …
Read More »सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सेलू (प्रतिनिधी ) नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद चंद्रकला ज्ञानदेव सावंत यांचा पदग्रहण समारंभ आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सेलू बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोडगे …
Read More »सनातन रक्षा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब राखे यांची नियुक्ती
गंगाखेड/परभणी (प्रतिनिधी) सनातन रक्षा दल केंद्रीय कार्यालय नवी दिल्ली संपूर्ण देशभर सनातन धर्माचे रक्षा करणे सनातन धर्माचे उपक्रम राबविणे ही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश मंत्री शंकरराव लोखंडे पंढरपूर यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष नीरज भाई मिश्रा यांनी परभणी जिल्हाध्यक्षपदी सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे व्यंकटेश उर्फ बाळासाहेब राखे यांची परभणी सनातन रक्षा दल जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती …
Read More »जि प प्राथमिक शाळा नामदेव नगर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
पाथरी प्रतिनिधी 3 जानेवारी शनिवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामदेव नगर येथे बालिका दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक गोविंद हरकळ त्याचबरोबर नगरसेवक अमोल भाले उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत व सर्व समिती सदस्य उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक …
Read More »सावित्रीबाई यांच्याकडे समाजपरिवर्तनाची दृष्टी होती- राजेंद्र पवार
सेलू ( प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले ज्या सामाजिक वातावरणात जन्माला आल्या ते वातावरण अत्यंत प्रतिघामी विषम आणि अ मानवी होते. जातीभेद हा समाज व्यवस्थेचा कणा मानला जात होता. जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेचे नियम इतके कठोर होते की माणसाच्या आयुष्याची दिशा त्यांच्या जन्माने ठरवली जात होती. अस्पृश्यतेच्या नावाखाली समाजातील मोठ्या वर्गाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला गेला होता. स्त्री ही पुरुषाची मालमत्ता …
Read More »विद्यार्थ्यांची जडण घडण व त्याचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्पर्धा आवश्यक- मिलिंद सावंत
सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या जडण घडण व व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी स्नेहसंमेलनानिमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आवश्यक असतात .असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी परितोषक वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले . येथील के बा विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे परितोषक वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते यावेळी अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी हे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com