09/05/26
Breaking News

मराठवाडा

आमचा जिव घेतला तरी जमिनी देणार नाही…सहजपुरमध्ये नेमंक काय घडलयं….

परभणी,दि 20 सरकारच्या दडपशाहीने कहर केला असुन त्याचा प्रत्यय सहजपुर जवळा येथे आला आहे. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला!” अशा संतप्त घोषणा देत परभणीतील सहजपूर जवळा येथील शेतकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे, गावाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, मध्यरात्रीपासूनच शेतकऱ्यांची धरपकड …

Read More »

सेलूत स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

सेलू ( नारायण पाटील ) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ,अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल,सेलू यांच्या वतीने आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म.छत्रपती संभाजीनगर प्रायोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन दि २३ व २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेले आहे . येथील नूतन विद्यालयाच्या रा .ब .गिलडा सभागृहात आयोजित या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प “समग्र …

Read More »

सेलूत शाहू नगर मध्ये अखंड हरिनाम व भागवत कथेस प्रारंभ

सेलू / प्रतिनिधी – येथील शाहू नगर मधील निलकंठेश्वर मंदिर मध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेस उत्साहात प्रारंभ झाला असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . दि १९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या या नाम सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन ,दुपारी १२ ते ४ या वेळेत श्रीमद भागवत कथा ,सायंकाळी ६ …

Read More »

वालूरच्या मराठी शाळेत आनंदनगरी

चिमुकल्यांनी घेतले व्यवहारज्ञानाचे धडे सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील वालूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी आनंदनगरी साकारली गेली. या उपक्रमात पहिले ते पाचवीच्या चिमुकल्या मुला-मुलांनी स्वतः अनेक पदार्थ बनवून आपली छोटी दुकाने थाटामाटात मांडली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारातील गणिती हिशोब आणि वास्तविक जीवन यांचा मेळ कसा लावायचा, याचा प्रात्यक्षिकातून अनुभव देणे हा …

Read More »

शिवजयंतीनिमित्त गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिर

सेलू ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर गुगळेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे. बळीराजा मित्र मंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. स्वच्छता मोहीम, …

Read More »

पतंजलीच्या मधाची  झाली साखर; ग्राहक पंचायतची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

नारायण पाटील सेलू :- सेलू येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी पतंजली कंपनीच्या मधाबाबत गंभीर तक्रार दाखल केली आहे. डॉ. मोरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी सेलू येथील पतंजली स्टोअरमधून एक किलो पॅकबंद मध खरेदी केला होता. त्यातील सुमारे अर्धा किलो मध वापरल्यानंतर उर्वरित अर्धा किलो मध पूर्णपणे गोठून साखरेसारखा …

Read More »

विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! विज्ञान वारी जिल्हास्तरीय साठी निवड

सेलू (प्रतिनिधी): परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत सेलू येथील विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. गौरांग निलेश पाटील व प्रणव विठ्ठल सुरवसे यांची या विज्ञानवारी …

Read More »

आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या शाळेला विसरू नका-उल्हास पांडे

सेलू दि १७(प्रतिनिधी) विद्यार्थी अवस्था ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय अनमोल क्षण असतात.विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवताना शाळेने केलेले संस्कार आयुष्यभर शिदोरी म्हणून सोबत ठेवावे आणि आपल्या जीवनात कितीही मोठे झालात तरी शाळेला विसरू नका असा मोलाचा सल्ला नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उल्हास पांडे यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख …

Read More »

सरकारने थकीत शेतकरी कर्जदारांची माहीती मागवली…लवकरच…

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काही सकारात्मक घोषणा होऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या हालचालींमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून 2025 पर्यंत …

Read More »

नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!’विज्ञानवारी’ लेव्हल–III साठी जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड

सेलू (प्रतिनिधी): परभणी येथील परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पात्रता पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय परीक्षेत नूतन विद्यालय, सेलू येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची तृतीय फेरी (लेव्हल–III) जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे. विज्ञानवारी सेलू तालुकास्तरीय परीक्षेत सान्वी गजानन शितळे हिने प्रथम क्रमांक,तन्मय …

Read More »