07/08/26
Breaking News

गुंज संस्थानचे प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे अपघाती निर्वाण

नारायण पाटील
सेलु,दि 17
शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे आज शुक्रवार, १७ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले.
गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते.
धुळे-सोलापूर महामार्गावर संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून आला. शहरातील एका खाजगी रुग्णालयात महाराजांना दाखल करण्यात आले परंतु काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यावेळी महाराजांसमवेत त्यांच्या लहान भावाची पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर रा. सातारा या देखील होत्या. त्यांचेही या अपघातात निधन झाले. महाराजांच्या दुसऱ्या लहान भावाचे जावई सेलूचे आशुतोष डुघरेकर हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुढील संस्कार उद्या शनिवारी सकाळी गुंज येथे होणार आहेत. महाराजांचा केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील खूप मोठा शिष्य परिवार आहे. प. पू. कालिदास महाराज हे ब्रह्मचारी व मौनी होते. केवळ दत्त गुरूंच्या आराधनेची पंचपदी वगळता ते कायम मौनात असत. कालिदास महाराजांच्या निधनामुळे सर्वदूर पसरलेल्या त्यांच्या शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.

Check Also

श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी डॉ. पवन चांडक यांची निवड

परभणी,दि 27  प्रतिनिधी सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन …