07/08/26
Breaking News

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17
पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी (दि. १७) सर्वानुमते करण्यात आली. संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी सचिन रायपत्रीवार, तर सचिवपदी दिलीप देवकर यांची निवड करण्यात आली.
ही बैठक व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष नेमिनाथ जैन, माजी तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, आनंदकुमार मुरक्या, रंगनाथ गडदे, प्रभाकर कुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी मुंजा कंठाळे व किसानप्रसाद खाडे, उपाध्यक्षपदी संदीप माहूरकर, गणेश ठाकूर व श्रीपाद जोशी, सचिवपदी दिलीप देवकर, सहसचिवपदी तुकाराम सर्जे, संघटकपदी प्रशांत मुळी, सहसंघटकपदी पंकज चव्हाण, कोषाध्यक्षपदी रामकिशन ठोंबरे, सहकोषाध्यक्षपदी संतोष तायडे, प्रसिद्धीप्रमुखपदी राम रेघाटे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून आबासाहेब देशमुख, अतुल जगताप, राजू गारकर, अशोक उकंडे, शिवानंद कंठाळे, संतोष लहाने व पद्माकर कौसडीकर यांची निवड करण्यात आली.
बैठकीस गुलाबराव शिंदे, चंद्रकांत गवळी, एकनाथ अवचार, अशोकराव उकंडे, यादव मस्के, नितीन बंगाळे, रामा डाकरगे, दीपक राजूरकर, भास्करराव चौधरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार वर्षांच्या कार्याची दखल; भागवत चव्हाण यांच्यावर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी
व्हाईस ऑफ मीडियाचे माजी जिंतूर तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण यांची जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते त्यांना निवडपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख यांनी चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांत संघटनेच्या बळकटीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. नव्या जबाबदारीतून जिल्हाभर संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्य करावे, अशा शुभेच्छाही उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

Check Also

श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी डॉ. पवन चांडक यांची निवड

परभणी,दि 27  प्रतिनिधी सन २०२६ चा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार’ परभणी येथील डॉ. पवन …