05/02/26
Breaking News

मराठवाडा

सेलू तालूका सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा,कॉंग्रेस,माकपची मागणी

सेलू,दि 23 (प्रतिनिधी) तालुक्यात जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर 25 या तिन्ही महिन्यात सातत्य पूर्ण पाऊस मुसळ धार पडत आहे,तालुक्यातील मंडळ मध्ये अतिवृष्टी,पडझड,ढगफुटी,ढगाळ वातावरणा मुळे सोयाबीन,कापूस,तूर,मूग,उडीद इत्यादी खरीप पिकाची पुरती वाट लागली आहे नदी,नाले,ओढे व ओढे काठची करोडो टन माती व पिके वाहून गेली आहेत अतिवृष्टी मुळे घराची पडझड झाली आहे गुरे,ढोरे पशुधन वाहून गेले आहे तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालें आहे त्या मुळे …

Read More »

पूर्णा येथे मोकाट गाढवांच्या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी

पूर्णा ता.२३ (प्रतिनिधी) पूर्णा शहरातील रस्त्यांवर मोकाट गाढवांचे दहशतवादी राज्य सुरूच आहे. सोमवारी (ता.२३) दुपारी मुख्य बाजारपेठेत पत्रकार अमृत कराळे यांच्यावर मोकाट गाढवांनी अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेने शहरातील नागरिकांचा संताप अनावर झाला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र सवाल उपस्थित होत आहेत. पुर्णा शहरात गेल्या काही महिन्यांपासून गाढव, गाय, वळू आणि कुत्र्यांनी रस्त्यांवर अक्षरशः मोकाट वचक निर्माण …

Read More »

परभणी जिल्ह्यात गोदामाई कोपली..लष्कराची तुकडी, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल

परभणी, दि. 23 – जायकवाडी, माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, सैन्यदल, एसडीआरएफचे पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विशेषत: नदीकाठच्या गावांतील लोकांनी दक्षता घ्यावी. कुठलेही धाडस करु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू …

Read More »

शेतकऱ्यांच्या लेकी होणार सॉफ्टवेअर इंजिनिअर,श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

परभणी,दि 22 (प्रतिनिधी)ः श्री शिवाजी महाविद्यालयातील बीसीएस्स संगणक शाखेच्या आठ विद्यार्थ्यांची पुणे येथील किरण या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या अग्रणी खाजगी कंपनीने प्रशिक्षण आणि नोकरीसाठी निवड केली आहे. यात शेतकरी वडील असलेल्या सहा मुलींचा समावेश आहे. या निवडीमुळे शेतकऱ्यांच्या मुलींचे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सदरील कंपनीने महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती आयोजित केल्या होत्या. यात लेखी आणि तोंडी परिक्षांत जे विद्यार्थी …

Read More »

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ला प्रकरणी सेलूत व्हॉईस ऑफ मीडियाने केला निषेध

सेलू,दि 22 (प्रतिनिधी)ः त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडियाच्या सेलू तालुका संघटनेच्या वतीने निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना सोमवार २२ रोजी निवेदन देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकारांवर २० सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंडांनी झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे …

Read More »

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग-पालकमंत्री मेघना बोर्डीकर

सेलू ( प्रतिनिधी ) सर्व सामान्य माणसाची जीवनशैली सुखी व संपन्न होण्यासाठी सेवा करांच्या दराची पुनर्रचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटी च्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य माणसांची जीवनशैली निश्चितच सुखी व संपन्न होणार आहे .असा विश्वास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला . यावेळी बोलतांना त्यांनी स्पष्ट …

Read More »

आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी

रवळगाव येथील आरती जगन्नाथराव रोडगे, भौतिकशास्त्र विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम सेलू / नारायण पाटील – तालुक्यातील रवळगाव येथील विद्यार्थिनी कु. आरती जगन्नाथराव रोडगे हिने ,अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम एस सी फिजिक्स म्हणजेच , भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली ,असेच …

Read More »

सतीश जाधव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

सेलू / प्रतिनिधी – शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविनारे,ज्यांचे कार्य सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आहे असे सतिश सदाशिव जाधव यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांनी सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार 2025 देऊन दि 20 सप्टेंबर शनिवार रोजी विश्वनाथ भावे नाटय़गृह वाशी नवी मुंबई येथे शाल हार पुष्पगुच्छ तसेचे …

Read More »

कब्बडी स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 21 ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि योगानंद महाविद्यालय, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी (मुले) स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवून यशाचा परंपरा कायम ठेवली आहे. सदरील स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला होता.श्री शिवाजी महाविद्यालयाने बहिर्जी महाविद्यालयाचा पराभव करून हा विजय मिळवला. या संघात कर्णधार आकाश कांबळे, ज्ञानेश्वर भुसारे, आत्मलिंग गलांडे, …

Read More »

आज जवळा येथे माटेगावकर मित्र मंडळ करणार रास्ता रोकोे

हिंगोली,दि 20 (प्रतिनिधी)ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संदीप भैया माटेगावकर मित्र मंडळाच्या वतीने जवळा बाजार येथे रविवार दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग तीन महिने अतिवृष्टी झाली यामुळे खरीप हंगामातील  पिके वाया गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा आणि …

Read More »