23/08/26
Breaking News

ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात श्री शिवाजी विधी महाविद्यालयाचे यश

परभणी,दि 16 
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि ग्रामीण तंत्रज्ञान महाविद्यालय विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे झालेल्या ज्ञानतीर्थ युवक महोत्सव २०२५ मध्ये श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी यांनी वक्तृत्व, वाद विवाद, मूक अभिनय, चित्रकला ,कोलाज, पोस्टर मेकिंग , व्यंग्यचित्रकला,कथाकथन, मेहंदी ,रांगोळी आणि कलात्मक जुळवणी इत्यादी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला . विधी महाविद्यालयाचा ११ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता .या स्पर्धांमध्ये विधी महाविद्यालयाचा एलएल. एम. प्रथम वर्ष या वर्गाचा विद्यार्थी कृणाल रामेश्वर बेद्रे यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावले .तसेच वादविवाद स्पर्धेमध्ये कृणाल रामेश्वर बेद्रे आणि किशन शिवाजी जाधव या विद्यार्थ्यानी द्वितीय पारितोषिक पटकावले .या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एल .धर्मापुरीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या संघाला मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.के .एस .नेहरकर व प्रा. डॉ. एस. डी. जवंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

टोलेजंग इमारत सज्ज, तरी वाचक प्रतीक्षेत! हिंगोलीतील नवीन जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन कधी?

​हिंगोली (विशेष प्रतिनिधी): हिंगोली शहरातील महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारण्यात आलेली जिल्हा ग्रंथालयाची भव्य आणि …