नारायण पाटील सेलू,दि 23 ः खबर मिळताच माणुसकी व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सेलू पोलिसांनी केलेल्या संवेदनशील प्रयत्नामुळे तब्बल १२ वर्षानंतर येथील मायलेकांची भेट झाली आहे .पोलिसांनी दाखवलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . मुंबई कार्यक्षेत्रात १३ जानेवारीला भिक्षेकरीविरुद्ध कारवाई दरम्यान पोलीस पथकाला एक महिला भिक्षा असताना आढळून आली. संबंधित पोलीस यंत्रणेने या महिलेला जे जे मार्ग पोलीस ठाणे येथे …
Read More »मराठवाडा
“कोंडी” कथासंग्रह म्हणजे संघर्षशील व्यक्तीचा प्रवास – प्रा.डॉ. कीर्तीकुमार मोरे
सेलू ( प्रतिनिधी ) शेतमालाचे भाव कोसळल्यावर शेतकऱ्यांच्या मनं सुन्न करणारी अवस्था ,भूक,स्त्री , शोषण आणि कठीण परिस्थिशी दोन हात करणाऱ्या संघर्षशील व्यक्तीचा ठाव घेणारा कोंडी या कथासंग्रहातून होते. असं प्रतिपादन प्रा. डॉ. कीर्तीकुमार मोरे यांनी सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या एक दिवस एक पुस्तक व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने ३६ वे पुष्प गुंफताना केले. येथील …
Read More »सायन्स एक्स्पो मध्ये नूतन महाविद्यालयाचे यश
सेलू,दि.22 दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकरच्या वतीने आयोजित DBC Science Expo 2026 मध्ये नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रतिकृती (मॉडेल्स), सेमिनार सादरीकरणे तसेच संशोधन पोस्टर्स प्रभावीपणे सादर केली. यामध्ये समर्थ सचिन कुंडीकर यास सेमिनार सादरीकरण मध्ये तृतीय क्रमांक तर यज्ञेश दिगंबरराव जोशी यास पोस्टर सादरीकरणमध्ये …
Read More »नंदू दरक यांना स्वीकृत सदस्य पदी घेण्याची जनतेची मागणी
आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष परभणी प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वसाधारण पुरुष गटातून निवडून लढवलेले उमेदवार नंदकिशोर दरक हे अत्यल्प मताने पराभूत झाले. परंतु जनतेसाठी सतत सेवेस तत्पर असलेल्या नंदकिशोर दरक यांना परभणी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदी घेण्यात यावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांतून करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत नंदकिशोर दरक हे प्रभाग क्रमांक 15 मधून …
Read More »माँ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 68 दात्यांचे रक्तदानातून अभिवादन
शेख वाजीद जिंतूर,दि 21 ः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व सकल मराठा समाज व पुरोगामी महाराष्ट्र यांच्या वतीने बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून मातृत्वाला अभिवादन केले. भारत देशाला दोन छत्रपती देणाऱ्या माँ साहेब जिजाऊ व सर्वसामान्य माणसाला शिक्षणाचे दार …
Read More »भाजपा नेते विलास बाबर राष्ट्रवादीत… पोखर्णी जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल
परभणी,दि.21(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर यांनी बुधवार 21 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्याने भाजपास सोडचिठ्ठी दिली अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पोखर्णी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पोखर्णी या गटातून आपणास उमेदवारी जाहीर केली जाईल, एबी फॉर्मही दिला जाईल, असे भाजपाच्या श्रेष्ठींनी नमूद केले होते. त्यामुळे ते दुपारी 1 वाजेपर्यंत एबी …
Read More »सेलूच्या श्रीमती सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना कर्तृत्ववान माता सन्मान पुरस्कार जाहीर
सेलू ( प्रतिनिधी ) मानव सेवा विकास प्रतिष्ठान परभणीच्या वतीने “कर्तृत्ववान मातांचा सन्मान पुरस्कार” सेलू येथील श्रीमती सुरेखा आहेरकर-पाटवकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार सन्मान सोहळा प्रतिष्ठांणच्या वतीने परभणी येथे २१ जानेवारी ते २५जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या आई महोत्सवामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. सुरेखा आहेरकर या आहेर बोरगाव येथे नितीन माध्यमिक विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दहावी शिक्षण …
Read More »मीटरला रिडींग दिसत नसल्याचे कारण दाखवून वीज ग्राहकांची अडवणूक
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरात सध्या विजेच्या मीटर चे बिल जास्त आल्याच्या तक्रारी वाढत असून वीज ग्राहकांना महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत .यामुळे ग्राहकाच्या प्रचंड नाराजी पसरत असून लवकरच यासाठी आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते . शहरात सध्या मीटर रिडींग चे काम एका खाजगी कंपनीला दिल्यागेले असून त्यांचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज ग्राहकांची मीटर रीडिंग घेऊन …
Read More »सेलूमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा आढावा बैठक संपन्न,१३० मतदान केंद्राची निश्चिती
सेलू ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या अनुषंगाने सोमवारी १९ जानेवारी रोजी सेलू तहसील कार्यालयात निवडणूक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील तसेच क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला निवडणूक निर्णय …
Read More »महिलांच्या स्वावलंबनासाठी शुभंकरोती फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीयच- उदय जाधव
सेलू ( प्रतिनिधी ) शुभंकरोती फाऊंदेशन चे कार्य निश्चितच महिलांच्या स्वावलंबनासाठी उलेखनियच ठरणारे आहे .असे प्रतिपादन सेलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय जाधव यांनी प्रशिक्षण केंद्राच्या भेटी दरम्यान केले . महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या शुभंकरोती फाउंडेशन, सेलू येथे महिलांसाठी सुरू असलेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रास आज श्री. उदय जाधव तसेच श्री. भाऊसाहेब …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com