10/08/26
Breaking News

कुपटा,वालुर येथे समाधान शिबिराचे आयोजन

सेलू दि ०६(प्रतिनिधी.)
महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागळातील लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत. सदरील सुधारणाचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विदयार्थ्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा 1 अंतर्गत दिनांक ०७ मार्च रोजी वालुर महसूल मंडळामध्ये दुर्गादेवी बाजार मैदान, वालुर येथे तसेच १४ मार्च रोजी जि.प.शाळा कुपटा महसूल मंडळ स्तरावील मौ. कुपटा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियांना अंतर्गत अनेक लाभ नागरीकाना देण्यात येणार आहेत.यामध्ये विविध प्रमाणपत्रे रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र इत्यादी, अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणी, प्रलंबीत शेतकरी नोंदणीस मान्यता देणे, पि.एम. किसान योजनेअंतर्गत नविन लाभार्थी अर्ज स्विकृती, प्रलंबीत लॅण्ड सिंडिंगची कार्यवाही, योजनेतील लाभार्थी यांच्या अडचणीचे निराकरण करणे, शिधापत्रिका वाटप, शिधापत्रिकेतील नांवे ऑनलाईन करणे, शिधापत्रिकेत नांवे वाढविणे अथवा कमी करणे, सामाजिक अर्थसहाय योजनेतील विविध योजनांचे लाभार्थी यांचे अर्ज घेणे, प्रलंबीत प्रकरणातील त्रुटीची माहिती देउन पुर्तता करुन घेणे, लाभार्थ्याची डीबीटी करुन घेणे,जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत मयत खातेदाराच्या वारसाची नांवे 7/12 वर लावणे,फेरफार निकाली काढुन लाभार्थ्यास शिबीरामध्ये 7/12 चे वाटप करणे,महाभूमी पोर्टलवरुन डिजिटल 7/12 डाउनलोड करण्याचे प्रात्यक्षिक देणे व या सेवेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी नागरिकांना प्रात्साहीत करणे,तुकडेबंदी कायदेविरुध्द दिनांक 15.11.1965 ते 15.10.2024 पर्यत प्रमाणभुत सिमापेक्षा कमी क्षेत्राच्या जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व झालेले हस्तांतरण नियमौल करणे,7/12 मधील चुकासंदर्भात अर्ज स्विकारणे, कागदपत्र तपसणी करुन दुरुस्तीची नोंद घेणे,शासन निर्णय दिनांक 10 फेब्रुवारी 2025 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सुधारणा अधिनियम 2025 नुसार कलम 42 मध्ये झालेल्या मूलभूत बदलाबाबत (कृषक जमीन अकृषिक करणे बाबत झालेल्या सुधारणा) नागरिकांना माहिती देणे, महसूल सेवा बाबतीत उपस्थित नागरीकांचे अर्ज स्विकारणे, प्रस्तुत अर्जावर कार्यवाही करणे व निकाली काढणे याबाबत कार्यवाही करुन तक्रारीचे निवारणे करावे.
या प्रमाणे योजनांचे लाभ घेण्यासाठी योजनानिहाय आवश्यक कागदपत्राची यादी यासह देण्यात येत असुन त्याप्रमाणे कादगपत्र प्रती घेउन योजनाचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरीकांनी कुपटा व वालुर येथे आयोजित छत्रपत्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे सेलु तालुक्यातील नागरिकांना तालुका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
सदरील शिबिर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर,गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्या नियोजनात राबवण्यात येत आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

गंगाखेडात ‘सेफ फूड’ अभियान कागदावरच; अन्न प्रशासनाचा ‘कानाडोळा’?

रामप्रसाद ओझा | गंगाखेड प्रतिनिधी गंगाखेड : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे अन्न …