पूर्णा : दिनांक 20 ऑगसष्ट रोजी श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली राजीव गांधी यांच्या जीवनावर आणि कार्यावर माहिती देण्यात आली. या प्रसंगी गुरुबुद्धिस्वामी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. गोविंदराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार उप प्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर व प्रा.डॉ. शिवसांब कापसे …
Read More »मराठवाडा
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडा, मराठा समाजाची मागणी
परभणी,दि 22 (प्रतिनिधी): मुंबई येथे २७ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनात परभणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनासाठी कार्यकर्ते रेल्वेमार्गे मुंबईकडे रवाना होणार असल्याने परभणी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने आज परभणी रेल्वे …
Read More »एपीके फाईल ओपन करताच १.९१ लाख रुपये गायब
हिंगोली,दि 21 ः हिंगोली शहरात एका व्यक्तीच्या व्हॉटस् अॅपवर विवाह सोहळ्याची एपीके फाईल पाठविल्यानंतर फाईल ओपन करताच सायबर भामट्याने दोन व्यक्तीच्या बँक खात्यातून १.९१ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळती करून घेतल्याच्या प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर भागातील मधूकर राऊत यांच्या मोबाईलच्या …
Read More »कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक, क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव तसेच क्रीडा महोत्सवाचे भव्य उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील दीक्षांत सभागृहात पार पडले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या निमित्ताने विद्यापीठ परिसरात उत्साहाचे आणि सांस्कृतिक उर्जेचे वातावरण निर्माण झाले. उद्घाटन प्रसंगी माननीय …
Read More »डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाचा सुत्रधार शोधा :अंनिसची मागणी
परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खून प्रकरणातील सूत्रधार शोधावा, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेने बुधवारी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. दाभोळकर यांच्या निर्घृन खूनास 12 वर्षे पूर्ण होत आली आहेत. परंतु, खूनामागचा सूत्रधार अजूनही मोकाट आहे. शासन स्तरावर त्या सूत्रधारांना पकडण्याकरीता कोणत्याही हालचाली सुरु नाहीत, अशी खंत या समितीचे …
Read More »एमकेसीएलचा २५ वा स्थापनादिन पाथरीत उत्साहात साजरा
पाथरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल चा २५ वा स्थापनादिन पुणे येथे बुधवारी, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण द्वारे करण्यात आले. पाथरी येथील अक्षय कॉम्प्युटर्स या ठिकाणी हा थेट प्रक्षेपण सोहळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वन अधिकारी पांडुरंग कोल्हे, मध्यवर्ती बँक ऑफिसर …
Read More »कागदपत्रांसाठी शिक्षकांना वेठीस धरू नका, आ. विक्रम काळे यांची मागणी
परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः शालेय शिक्षण विभागानेच शाळांमधील नियुक्त शिक्षकांना मान्यता दिलेल्या असताना त्यांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.त्यासाठी शिक्षकांचा पगारही थांबविण्याचा इशारा दिलेला आहे.शिक्षण संचालकांनी काढलेला आदेश मागे घेण्याची मागणी करत असताना तुम्हीच मान्यता दिलेली असून तुमच्या कार्यलयातही संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत.त्यामुळे शिक्षकांकडून त्यांची कागदपत्रे मागून त्यांना वेठीस धरू नका अशी मागणी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांनी शालेय शिक्षण …
Read More »पाय घसरून पडल्याने दोन इसम पाण्यात वाहून गेले
सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील राजेवाडी ते वालूर रस्त्यावरील दुधना नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. सतत दोन दिवस चालू असलेला पाऊस व लोअर दुधना धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. सदरील पुलावरून तालुक्यातील दोन इसम छबुराव जावळे राहणार गुळखंड व मारुती रामभाऊ हरकळ राहणार वालुर हे पाय घसरून पाण्यात पडून वाहून गेले आहेत. …
Read More »वाढदिवसानिमित्त सर्वद्वितीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके
सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालयाचे सहशिक्षक बाबासाहेब शंकरराव हेलसकर आणि सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक डी.डी.सोन्नेकर यांचे सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी, शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांच्या पत्नी स्वाती यांनी संस्थेच्या ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ योजनेसाठी चार पारितोषिकासाठी ४० हजार रुपयांची देणगी …
Read More »रेल्वेही सामाजिक अभिसरणाचे एकमेव केंद्र म्हणजे भारतीय रेल्वे-रविकिरण गंभीरे
सेलू ( प्रतिनिधी ) समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे अत्यंत कमी पैशात छान प्रवास करता येणारे आणि ग्रामीण शहरी वा कुठलाही भेदाभेद न करता आपलेपणातून. सर्व प्रवाशांना समान मानून आपल्या पोटात सामावून घेत आपला प्रवास सुखकर करणारे साधन म्हणजे रेल्वे. रेल्वेतील प्रवासी आणि प्रवास हा माणसा माणसातील माणूसपण जागृत करायला भाग पाडतो.माणसाला माणुसकी जपायला व शिकायला भाग पाडतो. आपणं ज्यावेळी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com