15/12/25
Breaking News

भाजपा परभणी महानगरतर्फे ‘सेवा पंधरवडा २०२५’ चे आयोजन

परभणी,दि 15  (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा २०२५’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पार पडणार आहे.

या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून, कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर, ज्येष्ठ नेते मा.आ. रामप्रसादजी बोर्डीकर, माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, संघटनमंत्री संजय कौडगे, प्रेरणा वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र संजीवनी, विचारवंत व प्रबुद्ध नागरिकांचा गौरव, दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, वकृत्व व निबंध स्पर्धा, मॅरेथॉन, ‘वोकल फॉर लोकल’ उपक्रम, प्रदर्शन, स्वच्छता मोहिमा तसेच गरजूंसाठी सहाय्य अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Check Also

घरकुलाच्या थकीत हप्ते प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

सेलू ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बऱ्याच घरकुल धारकांचे थकित हप्ते तात्काळ जमा करावे नसता ठिय्या …